संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – विकास वाघमारे

आज संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – विकास वाघमारे

प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार

परळी (प्रतिनिधी) – संत परंपरेतील समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परळी यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम आज सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१६) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभाग, पुणे येथील सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात “फुले, शाहू, आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील संवादी समता आणि परिवर्तनवादी विचार” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांतील समान धागे, सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता व परिवर्तनाची दिशा यावर सखोल चिंतन करण्यात येणार आहे.
याच वेळी प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, सामाजिक कार्यात अग्रक्रमी योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सांगता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाने होणार असून, कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश दिला जाणार आहे.
मानवतावादी विचारधारेचे परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे , पत्रकार विकास वाघमारे, सुशिल पोटभरे, रोहित झिंजुर्डे, राहुल सूर्यवंशी , विशाल डोंबे , महेश मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!