परळी नगर परिषदेचा सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण जनतेसाठी असावे : व्यंकटेश शिंदे
परळी (प्रतिनिधी): परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि सभागृहाच्या कामकाजास सुरुवात झाली मागील काळात उपनगराध्यक्ष सभापती स्वीकृत सदस्य इतर निवडी बाबतच्या सर्वसाधारण बैठका तसेच काही विकासकामांच्या मंजुरीची ही बैठक पार पडली या सर्व बैठका येणाऱ्या काळात जनतेसाठी खुल्या असाव्या तसेच प्रत्येक सर्वसाधारण बैठकीचे सभागृहाच्या कामाचे थेट प्रक्षेपण जनतेच्या माहितीसाठी व्हावे अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केली आहे
ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे कामकाज विधान भवनात होते त्याचे थेट प्रक्षेपण जनतेसाठी खुले असते त्याच धर्तीवर निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या आपापल्या लोकप्रतिनिधी नगरसेवक जनतेसाठी काय करत आहेत सभागृहात जनहिताची विषय मांडणी होत आहे की नाही याचा उलगडा जनतेला व्हावा यासाठी प्रत्येक सर्वसाधारण बैठकीचे सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण व्हावे त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजाबाबत पारदर्शकता अबाधित राहील त्यामुळे उद्या होणाऱ्या 27 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अर्थसंकल्पीय सर्व साधारण बैठकीचे थेट प्रक्षेपण व्हावे अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केली आहे
