भैय्यासाहेब आदोडे यांचा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान

भैय्यासाहेब आदोडे यांचा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान

परळी / प्रतिनिधी

   येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक भैय्यासाहेब आदोडे यांचा जेष्ठ विचारवंत व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
समाजप्रबोधन, स्वच्छता आणि समतेचा अखंड संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळी येथे भव्य सुवर्ण शतकोत्तर महोत्सवी वर्ष सोहळा दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला.संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे करण्यात आले होते.
    यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सामाजिक कार्यात शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल भैय्यासाहेब आदोडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.फुले , शाहू, आंबेडकर चळवळीत सक्रिय असणारे भैय्यासाहेब आदोडे सर हे परळी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमात सहभागी असतात.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.परळी ,रमेश सोनाळे नांदेड, प्रा.डॉ. किशोर वाघ संभाजीनगर, अरविंद कांबळे संभाजीनगर, मनोहर व्हावळे गंगाखेड, पंडित जिंजुर्डे परळी, अनंत इंगळे परळी, जयवर्धन सूर्यवंशी परळी यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रस्ताविकपर भाषणात कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वी शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक लक्ष्मण वैराळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक पृथ्वी शिंदे तसेच निमंत्रक सुशिल पोटभरे, रोहित झिंजुर्डे, विकास वाघमारे, राहुल सूर्यवंशी, विशाल डोंबे, महेश मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!