गुरुवर्य महंत श्री.शेखर महाराज यांच्या शुभहस्ते मुर्ती स्थापना व कलशारोहन

दिघी-साई मंदिर चऱ्होली-भोसरी मंदिर चलो -परशुराम पवार

मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व लोकार्पण सोहळा दिघी-साई मंदिर चऱ्होली-भोसरी पुणे येथे उपस्थित रहावे:
जय जगदंबा याडी जय संत सेवाभाया जय जेता भाया, जय सामकी याडी ला नमन करुन. लकीशा बंजारा मिठू भूकीया, सामत दादा, रूपसिंगजी महाराज, कृषिरत्न वसंतराव नायक, डॉ रामराव बापू, रामसिंग भानावत, काशीनाथ नायेक लक्ष्मण चैतन्य बापू यांना आठवण करुन .
अत्यंत आनंद आणि उत्साह सोबत सुचित करत आहोत की सर्व देव-देवता,संत,महंत यांचे आशिर्वादाने व भक्तजनांच्या श्रध्दा व भक्तीने , गोर बंजारा तीर्थक्षेत्र गोर बंजारा सामाजिक संस्था दिघी, साई मंदिर चऱ्होली, भोसरी पुणे द्वारा आयोजित जगत जननी जगदंबा माता व गोर बंजारा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज याचे *मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व लोकार्पण सोहळाचे आयोजन होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सहपरिवार आणि परिजनाच्या सोबत येऊन आशिर्वाद प्राप्त करुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

“जय सेवालाल जय सेवालाल बोलो 22 तारखेन दिघी-साई मंदिर चऱ्होली-भोसरी मंदिर चलो .”

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, शुक्रवार दि.२०/०२/२०२६ ते रविवार दि. २२/०२/२०२६ पर्यंत गोर बंजारा सामाजिक संस्था दिघी, साई मंदिर चऱ्होली , भोसरी (धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोशाळेजवळ) खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:
शुक्रवार दि.२०/२/२०२६ व शनिवार दि.२१/२/२०२६ रोजी
सकाळी ७ ते १० वा. होम हवन
दुपारी १२ ते १ वा. विष्णू सहस्त्रनाम व सेवादास नित्यपाठ
दुपारी १ ते ३ वा. दुर्गामाता सप्तसतीपाठ
सायं. ७ ते ८ वा. आरती
रात्री ९ ते ११ वा. भजन व प्रसाद

दि. २०/२/२०२६ रोजी कलश यात्रा सकाळी ७ ते १० वा.

रविवार दि.२२/२/२०२६
सकाळी ७ ते १० वा. होम हवन
सकाळी १० ते ११ वा. मूर्ती अभिषेक
दुपारी ११ ते १२ वा. प्राणप्रतिष्ठा ध्वज पूजन कलशारोहण

महाप्रसाद दु. २ ते आपल्या आगमनापर्यंत.

मंदिर प्रतिनिधी
परशुराम पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!