ब्रेकिंग न्यूजः परळीत मध्यरात्री अरुण टाक यांच्या बंगल्याला भीषण आग

ब्रेकिंग न्यूजः परळीत मध्यरात्री अरुण टाक यांच्या बंगल्याला भीषण आग

परळी/प्रतिनिधि

शहरातील गिते पेट्रोल पंपच्या पाठीमागे असलेल्या विद्यानगर भागात आज रात्री भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग येथील प्रतिष्ठित नागरिक अरुण टाक यांच्या बंगल्याला लागली असून, आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले आहे.

पेट्रोल पंप जवळः ही आग पेट्रोल पंपच्या अगदी जवळ असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे लोटः आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की, त्याचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत आहेत.

नागरिकांचे प्रयत्नः स्थानिक नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता, आग विझवण्यासाठी आणि ती पसरण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!