परळी वैजनाथ प्रतिनिधी
सोनाई अँग्रो कारखान्याचे चेअरमन प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा 2700 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचा पहिला हप्ता दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत कारखान्यास ऊस गेलेल्या शेतकऱ्यांचा ऊसाचा हप्ता महेश को-ऑपरेटिव्ह बँक शाखा परळी वैजनाथ येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन आत्माराम कराड व संचालक प्रा. विजय मुंडे दिली आहे.
कारखाना सुरू झाल्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाचे बीले बँकेत वर्ग करण्यात आली आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत .तरी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपली रक्कम महेश को-ऑपरेटिव्ह बँकेतून घेऊन जावी असे कारखान्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.
